बीड
प्रा.डॉ.अशोक देवगुडे यांची मराठी विषयाच्या प्राध्यापक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

प्रा.डॉ.अशोक देवगुडे यांची मराठी विषयाच्या प्राध्यापक महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड
जयभवानी महाविद्यालयात संस्थेकडून सत्कार
पाटोदा (प्रतिनिधी) दि.१५ मार्च : येथील जय भवानी कला व विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे प्रा. डॉ.अशोक देवगुडे यांची मराठी भाषा प्राध्यापक महासंघाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शिवजयंतीच्या अनुषंगाने मराठी भाषा विषय प्राध्यापक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, राज्य कार्याध्यक्ष प्रा.संपतराव गर्जे, राज्य कार्याध्यक्षा प्रा. डॉ.मनीषा रिटे व राज्यसचिव प्रा. बाळासाहेब माने यांच्या उपस्थितीत ही निवड घोषित करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचा पाटोदा येथील जय भवानी महाविद्यालयात जय भवानी शिक्षण संस्थेचे व जगदंबा शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा.श्री. प्रमोद गोरकर , संस्थेचे मुख्य लेखापाल मा.श्री.प्रतापराव हातोटे ,प्राचार्य डॉ.विश्वास कदम यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्र.प्राचार्य प्रा.सोमनाथ घाडगेज्ञव संस्थेचे सहलेखापाल श्री.श्रीराम नाना शेळके यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रा. डॉ अशोक देवगुडे यांची मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापक महासंघाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिक्षण महर्षी मा.श्री. शिवाजीरावदादा पंडित,संस्थेचे अध्यक्ष तथाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मा.श्री. अमरसिंह पंडित (भैय्यासाहेब)संस्थेचे सचिव मा. श्री. जयसिंह पंडित, आमदार मा.श्री. विजयसिंह पंडित, शारदा स्पोर्ट क्लब चे कार्यवाह युवा नेते मा.श्री. रणवीर काका पंडित, युवा नेते पृथ्वीराजे पंडित,मा.श्री.अमृत डावकर सर,प्रा.काशीनाथ गोगुले, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री.दिलीपराव जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे संचलन सुप्रसिद्ध नाटककार प्रा.बापू घोक्षे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.रामकृष्ण प्रधान यांनी मानले.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद सर्व शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विध्यार्थी उपस्थित होते.
———-



