📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तात्काळ जामखेड तालुक्यासाठी नवीन व आगावु बसेस मिळाव्यात- ॲड.डॉ.अरुण जाधव

तात्काळ जामखेड तालुक्यासाठी नवीन व आगावु बसेस मिळाव्यात- ॲड.डॉ.अरुण जाधव

जामखेड प्रतिनिधी:-मा. आगार प्रमुख साहेब राज्य परिवहन महामंडळ जामखेड आगार समोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तसेच राज्य कार्यकारणी सदस्य ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांसह निदर्शने दि. 20 मार्च 2025 रोजी करण्यात येणार असल्यास निवेदन इशारा देण्यात आला.
अहिल्यानगरचा जामखेड तालुका हा शेवटचा तालुका आहे येथून पुढे मराठवाडा लागतो .जामखेडला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यातील बसेस जामखेड मार्गे पुणे मुंबई कोल्हापूर नासिक लातूर चिपळूण या ठिकाणी जातात त्यामुळे जामखेड मार्गे कायमच वर्दळ असते मात्र जामखेड आगारतून सुटणाऱ्या बसेसचा तुटवडा मात्र कायमच आहे. ज्या थोड्याफार बसेस आहेत त्या कालबाह्य झाल्या असून भंगारामध्ये जमा करण्याच्या अवस्थेमध्ये आहेत त्या कुठेही केव्हाही बंद पडतात त्यामुळे प्रवाशांवर पाश्चातापाची वेळ येत आहे.जामखेडकर यामुळे हैराण झाले चालक आणि वाहकामध्ये कोणाला कुठे ड्युटी लावायचे यावरून आगार जामखेड कर्मचाऱ्यांचे वाद होतात. तरीही अद्याप नवीन बसेसची सोय करण्यात आली नाही. जामखेडकरांना केव्हा नवीन बसमध्ये प्रवास करण्याचा मोका येईल अशी हैराण झालेली जनता वाट पाहत आहे
यावेळी योगेश साठे सोमनाथ भैलुमे संजय शेलार आतिश पारवे पोपट शेटे दत्ता भालेराव सचिन भिंगारदिवे विशाल पवार तुकाराम पवार राहुल पवार राजू शिंदे रजनी बागवान ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते.

Back to top button