बीड

संघटना बळकटीसाठी मान-अपमान बाजूला ठेवून काम करा – अशोक सावंत

संघटना बळकटीसाठी मान-अपमान बाजूला ठेवून काम करा – अशोक सावंत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियानाचा जामखेडमध्ये शुभारंभ

जामखेड | दि. २८ मार्च २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जामखेड तालुक्यातील सभासद नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ झाला. या वेळी पक्षाच्या संघटना वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी केले.

“अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची ताकद उभी करायची आहे. पक्षवाढीसाठी मान-अपमान बाजूला ठेवून कार्य करा,” असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे म्हणाल्या की, अजितदादा पवार समर्थकांची मोठी ताकद तालुक्यात आहे. हा पाठिंबा संघटना बळकटीसाठी वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला झुकते माप मिळाले पाहिजे,” अजित दादांच्या निधीचा इतरांनी फायदा घेतला आहे या निधीचा
योग्य वापर करून जनतेच्या प्रश्न सोडवण्यावर भर देण्याची गरज आहे.

 

*महेश निमोणकर यांना नगर परिषद अध्यक्षपदासाठी शिफारस*
संघटना मजबूत करण्यासाठी महेश निमोणकर यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहावे, असे सांगत सावंत यांनी जामखेड नगर परिषद अध्यक्षपदासाठी निमोणकर यांच्या नावाची शिफारस अजित दादा पवार यांच्याकडे करणार असल्याचे जाहीर केले.

*पाणी व एमआयडीसी प्रश्न सोडवण्यासाठी लढा*
तालुक्यातील पाणी आणि एमआयडीसी प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणाही सावंत यांनी केली.

या कार्यक्रमास युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंढे, तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, उपाध्यक्ष बापूराव शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर, उपजिल्हाध्यक्षा सुजाता कदम, स्मिता वाल्हेकर, नगर तालुका अध्यक्ष अशोक चौभे, कार्यालयीन सचिव साईनाथ भगत,सचिन ढेरे, वसंत डोळे,ऋषिकेश कुंजीर, प्रसिद्धी प्रमुख राम काळदाते यांच्यासह महासंग्राम युवा मंच , जामखेड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोहळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरज रसाळ यांनी मानले.

*कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवू – महेश निमोणकर*

सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांच्या मार्गदर्शनाखाली 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण आम्ही करत आहोत.रोहित पवार हे केवळ अजित पवार यांच्या मुळे आमदार झाले आहेत.तालुक्यात कुकडीच्या पाण्यावर अनेक वर्षे राजकारण झाले तरीही प्रश्न सुटलेला नाही. मात्र, आता अजितदादा पवार साहेब व सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवू तसेच
सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांचे कार्य चांगले आहे. त्यांच्या माध्यमातून जामखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे.तालुक्यात सर्वाधिक सभासद नोंदणी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button