विज्ञान व गणित विषयात राज्यात चमकदार कामगिरी – नवीन मराठी शाळेचा नवा विक्रम!

विज्ञान व गणित विषयात राज्यात चमकदार कामगिरी – नवीन मराठी शाळेचा नवा विक्रम!
शिष्यवृत्ती मिळवत विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले!
जामखेड प्रतिनिधी -राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड आयोजित परीक्षेत नवीन मराठी शाळेतील प्राथमिक विभागाप्रमाणेच माध्यामिक विभागातील विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत असे संपादन केले यामध्ये इयत्ता सातवी मधील चि.अथर्व राणी अजिनाथ शिरसाठ या विद्यार्थ्याने विज्ञान या विषयात राज्याच्या गुणवत्ता यादीत ५ वा क्रमांक पटकावला त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे रुपये १००० शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच इयत्ता आठवी मधील चि.वेदांत पल्लवी वैभव कुलकर्णी या विद्यार्थ्याने विज्ञान या विषयात राज्याच्या गुणवत्ता यादीत २२ वा क्रमांक पटकावला त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात येणार आहे , इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कु.समृद्धी दिप्ती विपुल कुलकर्णी या विद्यार्थिनीने गणित विषयात राज्यात ७ वा क्रमांक मिळवला तिला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परिषदेतर्फे रुपये ७०० शिष्यवृत्ती मिळणार आहे.
वरील विद्यार्थ्यांना श्रीमती. जायभाये मॅडम , श्री हजारे सर व श्री.सोनटक्के सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष सर्व संचालक व शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी ओळख मिळाली आहे.
*चौकट*
मुख्याध्यापिका यांचे कौतुकास्पद उद्गार:
“आमच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत मिळवलेले हे यश शाळेसाठी अभिमानास्पद आहे. त्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. विज्ञान आणि गणितासारख्या विषयांमध्ये राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे ही मोठी उपलब्धी आहे. विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही ते अशीच उत्तुंग भरारी घेतील, याची खात्री आहे.”
*मिना राळेभात*
मुख्याध्यापिका, नवीन मराठी प्राथमिक शाळा, जामखेड



