बीड

आदित्य कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प!

आदित्य कृषी महाविद्यालयात पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प!

प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवायचेच’, विद्यार्थांनी घेतली सामूहिक शपथ
बीड | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन अभियान मोठ्या उत्साहात पार पडले. केवळ नवीन झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, महाविद्यालय परिसरातील जुन्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या सोतब प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवायचेच’,अशी सामूहिक शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा आणि संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शाम भूतडा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रा. शाम भूतडा यांनी वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यांचे नियमित संगोपन, पाणी व्यवस्थापन आणि संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल, तर प्रत्येकाने वृक्ष संवर्धनात सक्रिय वाटा उचलला पाहिजे.
या मोहिमेत महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना जैवविविधता, जलसंधारण आणि हरित परिसर निर्मितीचे महत्त्व पटवून देण्यात आले. प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवायचेच’,अशी सामूहिक शपथ विद्यार्थ्यांनी घेतली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे बीड परिसरातील पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.
—–
वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नव्हे, तर कर्तव्य : डॉ. आदिती सारडा
आज आपण निसर्गाच्या असमतोलाचा आणि वाढत्या तापमानाचा सामना करत आहोत. यावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हाच आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केवळ झाडे लावून चालणार नाही, तर लावलेले प्रत्येक झाड जगवणे, त्याला पाणी देणे आणि त्याचे संरक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आदित्य शिक्षण संस्थेचा नेहमीच असा प्रयत्न असतो की, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच सामाजिक आणि पर्यावरणीय भानही निर्माण व्हावे.आजच्या तरुण पिढीने पर्यावरणाचे रक्षक बनून हरित वसुंधरा निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

Back to top button