संपादकीय

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीेवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

 

 

नवी दिल्ली | भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर सध्या अडचणींत सापडला आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे एकच खळबळ पहायला मिळत आहे. गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळताच त्यानं दिल्ली पोलीसात मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरच्या तक्रारीनुसार त्याला आयएसआयएसकडून (ISIS) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सध्या गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे, असं डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली सरकारच्या औषध महानियंत्रकांनी गौतम गंभीर फाऊंडेशन कोविड 19 औषधांची अवैध साठेबाजी आणि वितरण प्रकरणात दोषी आढळल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या अडचणीत वाढ झाली होती. अशातच पुन्हा एकदा गंभीरच्या अडचणी वाढल्या आहेत.

Back to top button