संपादकीय

नवाब मलिक यांच्यानंतर आता शाहरूख आणणार वानखेडेंना अडचणीत

 

मुंबई | ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान यांच्यासह तिघांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची नुकतीच मिळाली आहे. यात या प्रकरणाच्या तपासावरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यामुळे आता अभिनेता शाहरुख खान याने एनसीबी विघ्गीय संचालक समीर वानखेडे यांना अडचणीत आणण्याची तयारी केली आहे.

आर्यनला अटक झाल्यापासून ते त्याची सुटका झाल्यानंतर आतापर्यंत शाहरूख खानने या प्रकरणावर काहीही विधान केले नव्हते. या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केल्याने आता शाहरूखच्या वकिलांनी त्याला वानखेडेंवर कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शाहरुख लवकरच वानखेडेंच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या आदेशात एनसीबीकडे कोणतेही पुरावे नसल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे. आदेशात म्हटले आहे की, आर्यन, अरबाझ आणि मुनमुन यांच्या विरोधात त्यांनी अमली पदार्थांसाठी कट आखल्याचे कोणेतेही पुरावे नाहीत. याचबरोबर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. या आरोपींनी समान हेतू ठेवून बेकायदा कृत्य केल्याचा एकही पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. ते तिघे एका क्रूझमधून प्रवास करीत होते म्हणून त्यांना कटाचा भाग ठरवणे शक्य नाही. तसेच, तिघांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नव्हती.

Back to top button