महाराष्ट्र

कलम ३७० हटवल्यानंतरही अद्याप कश्मीरातील प्रश्न सुटलेले नाहीत

 

नागपूर | कलम ३७० हटवल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र ३७० कलमावर सुद्ध सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले, मात्र यामुळे तेथील समस्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत, असे मोठे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी नागपूरमध्ये केले.

नागपुरात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाकडे एक ऐतिहासिक निर्णय म्हणून पहिले जात आहे. याचदरम्यान कश्मीरच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आले आहे. मी अलीकडेच जम्मू-कश्मीरचा दौरा केला. कलम ३७० रद्द केल्यामुळे तेथील विकासाचा रस्ता मोकळा झाल्याचे दिसले. मात्र प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत.

पुढे बोलताना ते म्हणा ले की,एका वर्गाला अजूनही स्वातंत्र्याची प्रतीक्षा आहे. समाजाला काश्मिरातील लोकसंख्येच्या या वर्गापर्यंत पोहोचले पाहिजे. जेणेकरून त्या वर्गाला हिंदुस्थानशी एकीकृत केले जाऊ शकेल, असे भागवत म्हणाले. पूर्वी जम्मू व लडाखला दुजाभावाची वागणूक मिळायची, कश्मीर खोऱयातील सुविधांचा 80 टक्के निधी लोकांच्या भल्याचा विचार न करता स्थानिक नेत्यांच्या खिशात जायचा. आता परिस्थिती बदललीय आणि लोक आनंदाने जीवन जगताहेत. गेल्या महिन्यात मुंबईतील एका कार्यक्रमात मी जम्मू काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्यांची भावना जाणून घेतली. त्यांना हिंदुस्थानी बनून राहायचेय, असे भागवत यांनी सांगितले.

Back to top button