📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून नियोजन बैठका; इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार— जिल्हा सरचिटणीस लांडे व बडे

मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून नियोजन बैठका; इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार— जिल्हा सरचिटणीस लांडे व बडे
प्रतिनिधी : बीड आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्यात संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, या अनुषंगाने विविध तालुक्यांमध्ये नियोजन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकींच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची रणनीती ठरविणे, संघटन अधिक मजबूत करणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, आगामी १ किंवा २ जानेवारी रोजी मा. ना. पंकजाताई मुंडे स्वतः जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
तालुकानिहाय नियोजन बैठकींचे वेळापत्रक
दिनांक : २६ डिसेंबर
वडवणी तालुका – सकाळी १०.३० वाजता
धारूर तालुका – दुपारी १२.३० वाजता
माजलगाव तालुका – दुपारी ३.०० वाजता
दिनांक : २७ डिसेंबर
केज तालुका – सकाळी ११.०० वाजता
अंबाजोगाई तालुका – दुपारी १.०० वाजता
परळी तालुका – दुपारी ३.०० वाजता
दिनांक : २८ डिसेंबर
बीड तालुका – सकाळी ११.०० वाजता
गेवराई तालुका – दुपारी १.०० वाजता
तालुकानिहाय प्रभारी
वडवणी, माजलगाव व धारूर या तालुक्यांसाठी
जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ. योगेश क्षीरसागर, अक्षय मुंदडा व नवनाथ शिरोळे हे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
परळी, अंबाजोगाई व केज या तालुक्यांसाठी
जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, मा. बदामराव पंडित, सर्जेराव तांदळे व बाळराजे पवार यांच्याकडे प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
बीड व गेवराई या तालुक्यांसाठी
जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माधव निर्मळ, सतीश मुंडे व संजय आंधळे हे प्रभारी राहणार आहेत.
या सर्व नियोजन बैठका भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, संघटना अधिक बळकट करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला भरीव यश मिळवून देण्याच्या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या-आपल्या तालुक्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रभारींकडे आपले अर्ज व नावनोंदणी करावी. संघटन बळकटीकरण व योग्य उमेदवार निवडीच्या दृष्टीने ही प्रक्रिया राबवली जात असून, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे व जिल्हा सरचिटणीस रामदास बडे यांनी केले आहे.
Back to top button