बीड
खा.सुप्रीताई सुळे यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमाने साजरा परळी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप; अनेक ठिकाणी वृक्षारोपण

खा.सुप्रीताई सुळे यांचा जन्मदिन सामाजिक उपक्रमाने साजरा
परळी उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळांचे वाटप; अनेक ठिकाणी वृक्षारोपण
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-लोकसभेतील संसदरत्न खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ.सुप्रियाताई सुळे यांचा सोमवारी जन्मदिवस असल्याने परळी वैजनाथ येथे अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तर शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
परळी वैजनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के पाटील, पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांच्या मार्गदर्शनाने अनेक उपक्रम राबवण्यात आले. सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तर 12 वाजता विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे, पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पाटील, ॲड.सतीश देशमुख, डॉ.संदीपान काळे, नितीन शिंदे, मुक्ताराम गवळी, रमेशराव ढाकणे, पांगरीचे राजेभाऊ फड, रामभाऊ राडकर, वर्षाताई रायभोळे, दिपाली सावंत, मंगलताई सोळंके, फिरोज सय्यद, रामचंद्र देवकते, रेखाताई जानराव, अश्विनीताई सरवदे, समाधान मुंडे, सनी मस्के, डॉ.बोरा, गोपाळ सलगर, हनुमंत फड, प्रल्हाद गित्ते, इमरोज खान, शेख फिरोज, प्रद्युम्न मुंडे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


