
नागपूर येथे ११ जून रोजी बहुजन समाज पार्टीची बैठक
नागपूर (प्रतिनिधी) : नागपूर येथे येत्या गुरुवार दिनांक ११ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बहुजन समाज पार्टी राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवाससमोर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे हे राहणार असून बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी मा. खासदार इंजि. रामजी गौतम (उत्तर प्रदेश) यांचे मुख्य मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे.
गुरुवार दिनांक ११ जून २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित या राज्यस्तरीय बैठकीस बहुजन समाज पक्षाच्या नांदेड जिल्ह्यातील सर्व विधानसभा पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष इंजि. सुभाष भोकरे यांनी केले आहे.


