📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

बहुजन समाजाने एआयच्या उपयोगासाठी सक्षम बनावे : बाबासाहेब मोरे

बहुजन समाजाने एआयच्या उपयोगासाठी सक्षम बनावे : बाबासाहेब मोरे
बीड – प्रतिनिधी
पे बॅक टू सोसायटी प्रोग्राम, बीड यांच्या वतीने राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, फातिमा शेख व मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त धानोरा रोड, बीड येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्रा. वसंत ओगले होते. प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. छाया सोंडगे यांनी आपले विचार मांडले. तसेच पे बॅक टू सोसायटीचे बाबासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बाबासाहेब मोरे यांनी प्रतिपादन केले की, २१ व्या शतकात बहुजन समाजाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वैयक्तिक व सामाजिक उन्नतीसाठी उपयोग करण्याचे शिकावे व इतरांनाही ते शिकवावे. एआय हे केवळ तांत्रिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता शिक्षण, व्यवसाय, पत्रकारिता व सामाजिक चळवळींसाठी प्रभावी साधन ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक सीता मोरे व भैय्यासाहेब मोरे या दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महानायिकांच्या जीवनकार्यावर वीस विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुमारी शिवानी दळवी यांनी केले.
Back to top button