📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह दिग्गजांची मांदियाळी!

मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह दिग्गजांची मांदियाळी!

राजेंद्र मस्के यांच्या कन्या राशी आणि सुनीलदत्त गलगटे पाटील यांचे सुपुत्र सिद्धांत यांचा साखरपुडा थाटात संपन्न

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या कन्या कु. राशी आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक सुनीलदत्त गलगटे पाटील यांचे सुपुत्र चि. सिद्धांत यांचा साखरपुडा समारंभ सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी बीड येथील सम्राट लॉन्स, कॅनॉल रोड येथे थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून दोन्ही परिवारांना शुभेच्छा दिल्या.

मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती

या साखरपुडा सोहळ्याला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, माजलगाव नगराध्यक्ष सुहाल चाऊस आणि उपनगराध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांनी कु. राशी आणि चि. सिद्धांत यांना भावी आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देत त्यांच्या नव्या जीवनप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.

संत-महंतांच्या उपस्थितीने सोहळ्याला आध्यात्मिक वैभव

या मंगल सोहळ्याला महंत शिवाजी महाराज, महंत महादेव महाराज, महंत स्वामी योगीराज महाराज, तुकाराम महाराज भारती आणि रामेश्वर महाराज शास्त्री यांची उपस्थिती लाभली. संत-महंतांच्या आशीर्वादाने आणि मान्यवरांच्या शुभेच्छांनी संपूर्ण सोहळ्याला आध्यात्मिक व मंगलमय स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी शिवसंग्रामचे प्रभाकर कोलंगडे, अशोकराव हिंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, राष्ट्रवादीचे नेते महेबूब शेख, चंद्रकांत नवले, शंकर देशमुख, विलास बडगे, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, सचिन मुळुक, नगरसेवक अमर नाईकवाडे, महेश धांडे, गोविंद शिराळे, मनोज गोडसे, आयुब पठाण, निजाम शेख, खुर्शीद आलम, मोईन मास्टर, सनी माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, विजकांत मुंढे, प्रकाश कवठेकर, गंगाधर घुमरे, नारायण शिंदे, भारत काळे, आरुण नाना डाके, दिलीप धूत, संपादक अजित वरपे, संतोषराव मानूरकर, वसंत मुंडे,शेख तय्यब, गणेश सावंत, जालिंदर धांडे, दत्त देशमुख, वैभव स्वामी आणि अभिजीत नकाते,केशव कदम,यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

वाद्यांचा गजर, मंगलध्वनी आणि शुभेच्छांचा वर्षाव!

पारंपरिक विधी, वाद्यांचा गजर, मंगलध्वनी आणि आप्तेष्टांच्या उत्साही उपस्थितीमुळे सम्राट लॉन्स परिसर आनंदमय झाला होता. नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत दोन्ही परिवारांतील स्नेहबंध अधिक दृढ झाले. उपस्थितांनी राशी आणि सिद्धांत यांना सुखी, समृद्ध आणि यशस्वी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्ञानदेव काशिद आणि मारुती तिपाले यांनी केले. आपल्या प्रभावी निवेदनशैलीतून त्यांनी कार्यक्रमातील विविध टप्पे सुरेखपणे गुंफत सोहळ्याची रंगत वाढवली.

मस्के आणि गलगटे परिवारांच्या आनंदसोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याचे आयोजन भास्कर तुकाराम मस्के पाटील, मदन तुकाराम मस्के पाटील आणि राजेंद्र तुकाराम मस्के पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. परिवारातील या आनंदाच्या प्रसंगी राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्याला शुभाशीर्वाद दिले.

दिग्गजांची मांदियाळी, संत-महंतांचे आशीर्वाद, आप्तेष्टांचा स्नेह आणि मंगलमय वातावरण यामुळे राशी आणि सिद्धांत यांचा साखरपुडा सोहळा अविस्मरणीय ठरला. मस्के आणि गलगटे परिवारांसाठी हा सोहळा आनंदाचा, नव्या नात्यांचा आणि भावी आयुष्याच्या मंगलमय सुरुवातीचा संस्मरणीय क्षण ठरला.

 

Back to top button