संपादकीय

परमबीर सिंग यांनी कसाबचा फोन ISI ला विकला असावा!

मुंबई | माजी गृमंत्री अनिल देशमुख यांचयव्हर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लगावून खळबळ उडवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यातच आता एसीपी राहिलेल्या शमशेर खान पठाण यांनी आज परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप मुंबईत घडलेल्या 26/11 प्रकरणाशी संबंधित आहेत.

त्यावेळी परमबीर सिंग हे ATS चे DIG होते. परमबीर सिंग यांनी दहशतावादी कसाबचा फोन हा आयएसआयला विकला असावा असा अत्यंत गंभीर आरोप निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी केला आहे. 26/11 चा हल्ला ज्यावेळी मुंबईवर झाला. त्यावेळी परमबीर सिंग हे त्यावेळी एटीएसचे प्रमुख होते. पण त्यांना त्यावेळी आपल्या देशाऐवजी शत्रू राष्ट्राला पाठिंबा देणं उचित वाटलं असावं. त्यांची त्यावेळची कृती हेच सांगते.

पुढे ते म्हणत्यात की, अजमल आमिर कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल फोन हा परमबीर सिंग यांनी ताब्यात घेतला होता. त्या फोनचं पुढे काय झालं ते समजू शकलं नाही कारण तो फोन परमबीर सिंग यांनी ISI ला विकला असावा. कसाबचा खटला चालला त्यावेळी किंवा त्या दरम्यान कधीही या फोनबाबत कुठलंही स्पष्टीकरण समोर आलं नाही.

Back to top button