संपादकीय

” भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायचीय”

 

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक मागच्या काही दिवसांपासून समीर वानखेडे आणि भारतीय जनता पक्षावर आरोप लागवताना दिसून येत होते. त्यातच आता पुन्हा एकदा मलिक यांनी भाजपवर आरोप लगावले आहेत. भाजपाचा राष्ट्रवाद हा मनूवादी भूमिका जाहीर करणारा आहे. त्यांना समाजात पुन्हा वर्ण व्यवस्था आणि जातीभेद आणायचा आहे. हा बोगस राष्ट्रवाद असून तो कधीच आम्ही मान्य करणार नाही, असा घणाघाती हल्ला
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढवला.

राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाने संविधा दिना निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी मलिक यांनी भाजपवर सडकून टीका केली. भारत एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी लोकशाही व्यवस्था निर्माण करणारा देश राहिल. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद आहे. आपला राष्ट्रवाद हा राज्यघटनेला बांधिल असणारा आहे. त्या राष्ट्रवादासाठी आपल्याला लढा दयायचा आहे, असं मलिक म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा ही विकणारी लोकं आहेत तर अदानी आणि अंबानी हे खरेदी करणारे आहेत. समतावादी समाज हे आपल्या राज्यघटनेतील मूल तत्त्व आहे. त्याला तडा देण्याचे काम केंद्रसरकार करत आहे, असा आरोप करतानाच राईट टू डिसिजनचा हक्क आपल्याला राज्यघटनेने दिला आहे. जे जनतेला मान्य नसेल तर सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याचा अधिकार आहे. अशी भूमिका घेतल्यानंतर सरकारला दोन पावले मागे हटण्याशिवाय पर्याय राहत नाही. हे देशातील शेतकरी आंदोलनाने दाखवून दिले याची आठवणही राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत बोलताना त्यांनी करून दिली.

Back to top button