संपादकीय

बाबरी मशिद प्रकरणी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांचे सूचक ट्विट

 

मुंबई | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर विविध मान्यवरांकडून अभिवादन केले. दरम्यान शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सूचक असे ट्विटही केले आहे. ‘आज सहा डिसेंबर च्या निमित्ताने अयोध्याच्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन,’ असे नार्वेकर यांनी म्हंटले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘आज सहा डिसेंबर या दिवशी अयोध्येत श्री राम मंदिराच्या निर्मितीसाठी शिवसैनिकांनी आपले बलिदान दिले. त्यांनी दिलेल्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम करतो.’ असे म्हणत नार्वेकर यांनी बाबरी मशिदीवर असलेल्या शिवसैनिकांचा फोटो ट्विट केला आहे.

बाबरी मशिदीच्या विद्ध्वंस प्रकरणाला आज 29 वर्षे पूर्ण होत आहेत. आज दिवशी 6 डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विद्ध्वंस केला होता. या घटनेमुळे देशभर दंगल उसळली होती. त्यात 2000 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. राम मंदिराच्या ठिकाणी सोळाव्या शतकात बाबरी मशीद बांधण्यात आली होती

Back to top button