बीड
चोरट्यांनी केले पोलिसाचेच घर साफ, वाढत्या चोऱ्या रोखण्याचे पी.आय. किशोर पवार यांच्यासमोर मोठे आव्हान

चोरट्यांनी केले पोलिसाचेच घर साफ, वाढत्या चोऱ्या रोखण्याचे पी.आय. किशोर पवार यांच्यासमोर मोठे आव्हान
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरामध्ये चोराचे प्रमाण वाढले असून पीएसआय किशोर पवार यांचा चोरट्यांना धाकच राहिला नसल्याचे पायाला मिळत आहे. चक्क पोलिसांच्याच घरी चोरी झाल्याने सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे असे गेवराईकरातून बोलले जात असून पीआय किशोर पवार यांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचेही बोलले जात आहे.
शहरांमधील शिवाई नगरीमध्ये कुसुम बबन वडते वय 49 वर्ष ह्या राहत होत्या. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हणाल्या आहे की, दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 च्या सुमारास मी अर्धा पिंपरी येथे असताना माझे पती आमच्या येथील घरी आले. त्यावेळी त्यांना आमच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले त्यावेळी त्यांनी मला फोन करून सांगितले की शिवाई नगर कोल्हेर रोड गेवराई आपल्या घरी चोरी झाली त्यामुळे मी ताबडतोब गेवराईतील घरी आले असता शेजाऱ्यांनी सांगितले की रात्री 1ते 2च्या सुमारास कुत्रे जोर जोरात भोकत होते कदाचित त्याच वेळी आमच्या घरी चोरी झाली असावी. नंतर मी घरात जाऊन पहिले असता सोन्या चांदीचे दागिने व कपाटामधून नगदी रक्कम असे 139,000 रू चोरट्यांनी डल्ला मारला असल्याचे समोर आले. यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली असून पोलिसांचे कुटुंबीय जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांकडून काय अपेक्षा करावी एक प्रकारे या चोरीने पीआय किशोर पवार यांच्यासमोर एक मोठे आव्हानच उभा केले आहे.



