ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वातावरण ‘कमळमय’

*जि.प. निवडणूक ग्रामीण विकासाला गती देण्याची सुवर्णसंधी ; कमळाला मतदान करून संधीचं सोनं करा*
*पिशोर, घाटनांद्रा, चौका, आडगाव, बजाजनगरला जोरदार सभा*
छत्रपती संभाजीनगर दि.०२..
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याची मोठी संधी मतदारांच्या हाती असून, ही संधी साधत भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपच्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या प्रचार सभांमधून केले.
जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ना. पंकजाताई मुंडे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आपल्या झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरवात केली. आज त्यांच्या पिशोर (कन्नड), घाटनांद्रा (सिल्लोड), चौका व आडगाव (फुलंब्री) आणि बजाजनगर येथे जोरदार सभा झाल्या.या सभांमुळे जिल्हा परिषद निवडणूक उत्साहाचे आणि कमळमय वातावरण निर्माण झाले. पंकजाताईंची सभा म्हणजे विजयाची खात्री असा विश्वास निवडणूक लढवत असलेल्या भाजपा उमेदवारांमध्ये निर्माण झाला आहे.
सकाळी पंकजाताई यांचे छत्रपती संभाजीनगर येथे विमानाने आगमन झाले. तिथून हेलिकॉप्टरने त्यांच्या सर्व सभा झाल्या. जाहीर सभांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातूनच प्रभावीपणे साधता येतो. पुढील पाच वर्षांत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजप ठोस काम करेल. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभांना अलोट गर्दी होत असून माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षवेधी होती.
माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेश पाटील बनकर, राजेंद्र जैस्वाल, दिलीपराव दानेकर, गंगाताई ताठे, मकरंद कोरडे, सुनील मिरकर यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ठिकठिकाणच्या जाहीर सभांना स्थानिक नेते गण, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



