बीड

निकृष्ट कामाची चौकशी करा! राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचा आक्रमक पवित्रा

निकृष्ट कामाची चौकशी करा! राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचा आक्रमक पवित्रा

७ दिवसांत कारवाई करा,अन्यथा उपोषण

जामखेड प्रतिनिधी :जामखेड नगरपरिषद हद्दीतील मलनिस्सारण प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे, नियमबाह्य व अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. यासंदर्भात आज (दि. ३ फेब्रुवारी २०२६) तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, अवधूत पवार,युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात,नगरसेवक राजेंद्र गोरे,वसीम सय्यद, माजी संचालक सागर सदाफुले,माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक,युवा नेते कुंडल राळेभात,इस्माईल सय्यद, माजिद कुरेशी,हरीभाऊ आजबे,अमोल गिरमे,प्रविण उगले, नासीर सय्यद,संदीप(आण्णा)गायकवाड,दिपक घायतडक,अशोक घुमरे,अनिल अडाले, सचिन शिंदे,प्रविण माकुडे, दादा महाडिक,सागर भोसले,बिलाल शेख,अमर चाऊस,नंदू आव्हाड, सुर्यकांत सदाफुले,दत्ता डिसले,इम्रान तांबोळी,प्रणव राळेभात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शहाजी राळेभात,वसिम सय्यद,प्रशांत राळेभात,कु़ंडल राळेभात, इस्माईल सय्यद आदींनी आपली प्रतिक्रिया दिली.

निवेदनात म्हटले आहे की, गटार चेंबर व चेंबरची साईज काँक्रीट करताना मंजूर अंदाजपत्रकातील मापदंड व तांत्रिक निकषांचे पालन होत नाही. कमी दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात आहे.तसेच गटारासाठी पाईप टाकताना जुने सिमेंट रस्ते जेसीबी मशीनने बेदरकारपणे फोडले जात असून त्यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी खोदलेली ठिकाणे दीर्घकाळ बुजवली जात नसल्याने अपघात, वाहतूक कोंडी, धूळ-चिखल व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांना निवेदन सादर करून तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बेमुदत उपोषण व तीव्र लोकशाही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

———————————–
*अतिक्रमण हटल्याशिवाय विकास नाही!*
गटार, पाणीपुरवठा, रस्ते सगळी विकासकामे अतिक्रमणामुळे रखडली आहेत.काहींच्या बेकायदेशीर अडथळ्यामुळे संपूर्ण जामखेडकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याप्रश्नी तात्काळ कारवाई करून शहराच्या विकासासाठी रस्ते त्वरित मोकळे करावेत,अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.

मा.शहाजी (काका) राळेभात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

Back to top button