संपादकीय

धक्कदायक | सरकारवर आरोप करत कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

 

कोल्हापूर | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरत करण्याच्या मुद्द्यावरून मागच्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहे. त्यातच राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याचा आरोप करत कोल्हापूर विभागातील एका एस. टी. कर्मचाऱ्याने आगारातच गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. इतर कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

सदानंद सखाराम कांबळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांचे गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कर्मचारी दोन दिवसापासून संपात उतरले आहेत. सकाळी कोल्हापूर बस स्थानकात गगनबावडा आगारातील कर्मचारी सदानंद कांबळे यांने रुमालाचा वापर करत गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याने निराश झालेल्या कांबळे याने हे पाऊल उचलले. कर्मचाऱ्यांच्या विश्रांती कक्षात अचानक त्याने आत्महत्येचा हा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यास वाचवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. कर्मचाऱ्यांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे बस स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली.

Back to top button