राजकीय

राऊत साहेब आपण आपली वसुली कमी करणार आहात का ?

 

देशात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य नागरिक हतबल झालेला असताना दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी सरकारवर पत्रकार परिषेद आणि सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

त्यातच दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्राने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. केंद्राच्या या निर्णयाचे अनेक राज्यांनी स्वागत करत दर कमी केले आहेत. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. राज्यसरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका सुरु आहे. दरम्यान, शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्वीटद्वारे सडकून टीका केली आहे.

ते म्हणतात, खासदार राऊत साहेब, इंधन दरवाढीसंदर्भातील निर्णयात केंद्राने एक पाऊल पुढे टाकत पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत. आपण महाराष्ट्रातील जनतेच्या खिशातून प्रति लिटर ३५ ते ४० रुपये काढत आहात. त्यातील आपण आपली वसुली कमी करणार आहेत का? ती जर तुम्ही कमी करू शकत नसाल, तर आम्हालाही नाईलाजाने म्हणावे लागेल की ‘आपले मन हे किडके मन आहे’, असा टोला लगावला आहे.

Back to top button