बीड

शिरूर कासारात स्पर्धा परीक्षांसह पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षणासाठी ‘निर्धार करिअर अकॅडमी’ची दमदार सुरुवात

शिरूर कासारात स्पर्धा परीक्षांसह पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षणासाठी ‘निर्धार करिअर अकॅडमी’ची दमदार सुरुवात
शिरूर कासार | बातमीदार
शिरूर कासार येथील पैठण–पंढरपूर  पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या निर्धार करिअर अकॅडमी – स्पर्धा परीक्षा,पोलीस तसेच सैन्य भरती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती व सैन्य भरतीची दर्जेदार तयारी स्थानिक पातळीवर अत्यंत माफक फीस मध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.
उद्घाटनप्रसंगी ह.भ.प. विवेक महाराज शास्त्री यांनी युवकांनी शिस्त, परिश्रम आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. तहसीलदार सुरेश घोळवे यांनी अशा प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत  दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षण मिळून त्यांचा मोठा फायदा होणार असून अधिकाधिक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे, पोलिस निरीक्षक श्री राजेश
गडवे, पीव्हीपी कॉलेज पाटोदा चे माजी प्राचार्य डॉ दत्तात्रय आघाव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे, सैनिक फेडरेशन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष कर्नल सुनील राजदेव, ईसीएचएस  पोलिक्लिनिक अहिल्यानगर मेडिकल  स्पेशालिस्ट लेफ्टनंट कर्नल डॉ सोमेश्वर गायकवाड, औरंगाबाद खंडपीठाचे  ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट अविनाश आघाव,प्रा. डॉ अशोक घोळवे सर ,यश फाऊंडेशन अहिल्यानगर चे श्री संजय डोंगरे,  डोंगरे प्राइड चे संचालक श्री शरद डोंगरे, श्री रामदास गुंड, श्री संजय ढाकणे,  सुरेंद्र खेडकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ अतुल नागरे,डॉ संभाजी नागरे, डॉ प्रविण ढाकणे , पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदीप आघाव ,डॉ रजनी ढाकणे ,  एक्साईज विभागाचे श्री बळीराम नागरे, शिरूर पंचायत समिती चे माजी उपसभापती श्री जालिंदर सानप, जांब चे माजी सरपंच श्री भागवत आघाव, बाजीराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तुकाराम खाडे ,कस्तुरबा गांधी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या मोहिनी आघाव – सानप,वीर पत्नी विद्या सानप, अरुणा नगरगोजे, सैनिक फेडरेशन अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्षा शीतल वीर, त्रिदल सैनिक संघटनेचे श्री बाळासाहेब आंधळे,  श्री कुशल घुले, रॉयल फौजी अकॅडमी चे खरसे साहेब, श्री विष्णू गर्जे , श्री संदीप सानप सर, श्री पवार मोटर्स चे श्री शांतिलाल पवार, श्री विनायक मोराळे व शिरूर कासार माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, आयडिएल इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री पवार सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट कर्नल डॉ सर्जेराव नागरे यांनी केले व त्यांनी निर्धार करिअर अकॅडमी च्या ध्येय व उदिष्टा विषयी माहिती दिली.
मान्यवरांनी अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवावे, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटनानंतर उपस्थितांनी अकॅडमीची पाहणी करून प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा जाणून घेतल्या.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन  श्री कैलास तुपे सर यांनी केले व आभार प्रदर्शन निर्धार करिअर अकॅडमी च्या संचालिका तथा सैनिक फेडरेशन महाराष्ट्र महिला ब्रिगेड अध्यक्षा,डॉ अर्चना आघाव- नागरे यांनी करून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानी झाली.
Back to top button