जामखेडमध्ये भाजपचा जल्लोष; पेढे वाटून विजयोत्सव साजरा

जामखेडमध्ये भाजपचा जल्लोष; पेढे वाटून विजयोत्सव साजरा
जामखेड : पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये तसेच राज्यातील पोटनिवडणुकांत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरमंडल भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
शहरातील विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडले. तसेच एकमेकांना पेढे देऊन विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला.जय श्रीराम च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विधानसभा व पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला अनेक ठिकाणी बहुमत मिळाल्याने शहरमंडलाच्या वतीने हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा. राम शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ! अशा प्रकारे घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला.जय श्रीराम’चे नारे देत, भगवे झेंडे व भाजपाचा झेंडा फडकावत जामखेड भाजपा पदाधिकारी यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला.
या प्रसंगी डॉ. भगवान मुरुमकर, रवि सुरवसे, दत्तात्रय वारे, ॲड. अजय काशिद, संजय काशिद, शरद कार्ले, पवन राळेभात, बापूराव ढवळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, बापूराव ढवळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, अनंता खेत्रे, दत्तात्रय वारे, ॲड. अजय काशिद, रवि सुरवसे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा. संजय राऊत, बाजार समितीचे संचालक विष्णू भोंडवे, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार, गटनेते तथा नगरसेवक तात्यासाहेब पोकळे, पवन राळेभात, मोहन (मामा) गडदे, अनिल यादव,गोरख घनवट,अर्जुन म्हेत्रे, मनोज कुलकर्णी, माऊली अंदुरे, बाळासाहेब गायकवाड, राहुल चोरगे, नागराज मुरुमकर, गणेश नेहरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



