राजकीय

माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार’

 

भारतीय जनता पक्षाचे नेते सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाच्या आणि स्वतःच्या अडचणीत वाढ करत असल्याचे दिसून आले होते. त्यात काही दिवसांपूर्वी हार्सवर्धन पाटील यांनी भाजपात आल्यापासून ईडीची भीती वाटत नाही तसेच शांत झोप लागते असे विधान करून नवा वाढ अंगावर ओढवून घेतला होता. आता त्या पाठोपाठ आणखी एका खासदाराने असेच विधान केले आहे.

 

माझ्यामागे कधीही सक्तवसुली संचलनालयाचा ससेमिरा लागणार नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे, असं वक्तव्य भाजप नेते संजयकाका पाटील यांनी केलं आहे. ते शनिवारी विटा येथील कार्यक्रमात बोलत होते. आम्ही राजकीय माणसं नसताना कर्ज काढून दाखवतो. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल ही माणसं आहेत का काय, असं संजयकाका पाटील यांनी म्हटलंय. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला भाजपमध्ये जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? तेव्हा मी त्याला म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? बाकी सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे, चांगली झोप लागते, चौकशी वगैरे नाही, असं वक्तव्य संजयकाका पाटील यांनी केलं आहे.

 

Back to top button