राजकीय

सोमय्या २६ ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात की,

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप लगावले होते. त्यातच महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे सध्या ईडी, सीबीआयसह अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या येत्या २६ आणि २७ तारखेला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत.

त्यामुळे येणाऱ्या दिवसात मंत्री अशोक चव्हान यांच्या अडचणी वाढनार असे संकेतच पाटील यांनी देत ईडीची पुढील कारवाई अशोक चव्हाण यांच्यावर होणार का? या प्रश्नावर पाटील यांनी माझ्या हसण्यावरुन समजून जा, अशा शब्दात सूचक विधान केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करुन किरीट सोमय्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी २१ ऑक्टोबरला ट्वीट करुन आपण २६ आणि २७ ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘सोमय्यांच्या या ट्वीटला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये तुमचं स्वागत आहे’, असं ट्वीट केलं आहे.

 

Back to top button