बीड

आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त  आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद

आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त  आयोजित शिवकालीन शस्त्रप्रदर्शनास अभूतपूर्व प्रतिसाद
५० हजार वह्या, पेन-पेन्सिल व प्रथमोपचार किटसह १० लाखांचे शैक्षणिक साहित्य भेट
माजलगाव | प्रतिनिधी
माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते सुंदरराव सोळंके महाविद्यालय, माजलगाव येथे आयोजित भव्य शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन व मर्दानी खेळ प्रात्यक्षिक कार्यक्रमास, विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमाने संपूर्ण माजलगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.तसेच आ.प्रकाश सोळंके यांनी पसायदान सेवा प्रकल्पास भेट देऊन अनाथ मुलांच्या सोबत  आपला वाढदिवस साजरा केला आणि या मुलांच्या भविष्यासाठी एक लाख रुपये देणगी म्हणून दिले.
तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था, पुणे यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात शिवकालीन तलवारी, भाले, ढाल, कट्यार, धनुष्य-बाण यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके, युद्धकौशल्यांचे सादरीकरण आणि शिवकालीन इतिहासावर मार्गदर्शनपर व्याख्याने घेण्यात आली. इतिहास संशोधक व शस्त्रअभ्यासक श्री. रविंद्र भाऊसाहेब जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन युद्धनीती, शिस्त आणि स्वराज्याची प्रेरणा याबाबत सखोल माहिती दिली.या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण पिढीमध्ये शौर्य, शिस्त, राष्ट्रप्रेम, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने शस्त्रांची माहिती घेतली तसेच अनेक शाळांनी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या प्रदर्शनास भेट देण्यासाठी पाठवले.या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तसेच वाल्मिकि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. अनिलभाऊ नखाते यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. याच कार्यक्रमाअंतर्गत आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तूऐवजी शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला नागरिक, संस्था, शिक्षक, पालक व व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमातून — ५०,००० वह्या (नोटबुक्स),मोठ्या प्रमाणावर पेन व पेन्सिली, फर्स्ट स्टेज बॉक्स (शालेय साहित्य संच)
असे एकूण सुमारे १० लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य स्नेहभेट मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने दिले. हे साहित्य लवकरच ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना विविध शाळांमार्फत वितरित करण्यात येणार आहे.
वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करून समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा मिळावी, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपली. त्यामुळे हा उपक्रम केवळ उत्सव न राहता सामाजिक चळवळ ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते सुंदर रावजी सोळंके सहकारी नागरी पतसंस्था, माजलगाव सहकारी मध्यवर्ती ग्राहक भांडार, सिंदफणा पब्लिक स्कूल, जिजामाता नर्सिंग अँड फिजिओथेरपी कॉलेज, सुंदर रावजी सोळंके महाविद्यालय,शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले तसेच कानिफनाथ विद्यालय मोहखेड,या सर्व संस्थांनी महत्त्वाची भूमिका निभावली.  सर्व सहकार्यकर्त्यांचे व दानशूर नागरिकांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
Back to top button