📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

ज्येष्ठांनी सकारात्मक, आनंदी, ताणतणावमुक्त राहावे–डॉ.दीपाताई क्षीरसागर

ज्येष्ठांनी सकारात्मक, आनंदी, ताणतणावमुक्त राहावे–डॉ.दीपाताई क्षीरसागर

बीडमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम

बीड (प्रतिनिधी)दि.१७ : जीवनाच्या संध्याकाळी एकटेपणा न बाळगता, सकारात्मक, आनंदी व ताणतणावमुक्त राहावे. मन प्रसन्न ठेवण्यासाठी छंद जोपासावेत व सतत कार्यरत राहावे, असे मत डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा, बीड आणि सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (काकू) महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘संधीकाली या अशा, धुंदल्या दिशा दिशा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात गणेश वंदना, गीत, योगनृत्य, मंगळागौरी गीते, भारूड, फील्मी गीते, गजल गायन, एकपात्री अभिनय, विनोदी काव्य, झुंबा नृत्य, काव्यवाचन, उखाणे, मुशायरा अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हाभरातून २०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रंगतदार सादरीकरण केले. कार्यक्रमाला डॉ. सारिका क्षीरसागर, प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, डॉ. संजय पाटील देवळाणकर आदींची उपस्थिती होती. सहभागी ज्येष्ठांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन डॉ. दुष्यंता रामटेके यांनी केले, तर आभार डॉ. अनिता शिंदे यांनी मानले. डॉ. राहुल सोनवणे, प्रा. दीपक जमधाडे, प्रा. सुरेश थोरात, इंद्रजीत भांगे यांनी संगीताची साथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय राख, प्रा. सोनाली गवारे, प्रा. नागेश शेटे, मिलिंद शिवणीकर, नामदेव साळूंके यांनी सहकार्य केले.
Back to top button