बीड
माधवी शरदराव कुलकर्णीचे सी.ए. इंटरमीडिएट परीक्षेत घवघवीत यश.

माधवी शरदराव कुलकर्णीचे सी.ए. इंटरमीडिएट परीक्षेत घवघवीत यश.
गेवराई येथील ज्येष्ठ विधीज्ञ अँड. डी. एम. कुलकर्णी यांची नात व विधीज्ञ अँड. शरद कुलकर्णी यांची सुकन्या हिने नुकत्याच झालेल्या अत्यंत कठीण अशा सी. ए. इंटरमीडिएट परीक्षेत प्रथम प्रयत्नातच घवघवीत यश प्राप्त केले.
माधवी कुलकर्णी हिने अथक परिश्रम व आपल्या आई-वडिलांचे मार्गदर्शनाने प्रथम प्रयत्नातच चार्टर्ड अकाउंट इंटरमीडिएट परीक्षेत ग्रुप ए व ग्रुप बी या दोन्ही ग्रुपमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे. व सी.ए. इंटरमीडिएट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
माधवी कुलकर्णी हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण गेवराई येथील इंदिरा गांधी इंग्लिश स्कूल येथे झाले असून त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण हे बलभीम कॉलेज, बीड येथे झाले आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्या नंतर माधवी हिने चार्टर्ड अकाउंटंट या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व सी. ए. च्या प्रथम वर्षाच्या फाउंडेशनच्या परीक्षेत माधवी कुलकर्णी हिने प्रथम प्रयत्नातच यश प्राप्त केले होते. व तीच परंपरा माधवी कुलकर्णी यांनी कायम ठेवून सी.ए. इंटरमीडिएट या कठीण परीक्षेच्या ग्रुप ए व ग्रुप बी या दोन्ही ग्रुपमध्ये प्रथम प्रयत्नातच यश प्राप्त केले आहे.
माधवी कुलकर्णीच्या यशाबद्दल गेवराईचे माजी नगराध्यक्ष श्री. सुशीलजी जवंजाळ, माजी उपनगराध्यक्ष अँड राजेंद्र राक्षसभुवनकर, माजी नगराध्यक्ष राधेश्यामजी अट्टल, गेवराई वकील संघाचे अध्यक्ष अमितजी मुळे, तसेच बबनरावजी मुळे, कृष्णा मुळे, संदीप मुळे, डॉक्टर हेमंतजी वैद्य, शिवकेशर पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेबजी बेदरे, महेश अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्ये साहेब, इंदिरा गांधी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर बांगर साहेब, बलभीम महाविद्यालय बीड येथील प्राचार्य व समस्त शिक्षक वृंद तसेच गेवराई शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती इत्यादींनी अभिनंदन केले आहे व माधवीच्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.



