मुंबई

‘मी हे खपवून घेणार नाही’ पाटील समीर वानखडे यांच्यावर टीका करणाऱ्यांवर क्रांती रेडकर कडाडल्या

 

अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाला अर्थात आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री असलेली क्रांती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी आर्यन खान आणि समीर वानखडे यामुळे क्रांती रेडकर चर्चेत आली नसून तिने एका वेबसाईटसंदर्भात केलेल्या ट्विटमुळं ती चर्चेत आली आहे.

एका बेवसाईटने दिलेल्या बातमीसंदर्भात तिने ट्विट करून वेबसाईटला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. संबंधित वेबसाईटने दिलेल्या बातमीच्या टायटलमध्ये क्रांतीवर आयपीएल फिक्सींगचे आरोप असल्याचं म्हटलं आहे. याबाबत क्रांतीने खुलासा केला आहे. बातमीचं टायटल दिशाभूल करणारं आहेच. शिवाय बातमीमध्येही वेगळीच माहिती दिली असल्याचंही क्रांतीने ट्विटमधून सांगितलं आहे.

क्रांतीने ट्विटमध्ये म्हटलं आहे,’तुम्ही हे काय करत आहात? फक्त काही व्ह्युजसाठी तुम्ही दिशाभूल करणारं टायटल दिलं आहे. कशासाठी? मी आधीच यासंदर्भात कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि जिंकली सुद्धा आहे. मी पूर्ण बातमी वाचली. चूकीच्या ओळखीचं प्रकरण त्यात लिहीलं आहे. मग हे टायटल असं का? माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी?’ असा सवाल विचारला आहे.

Back to top button