बीड

श्री माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेत माल खरेदी करुन रोकड बुकवर खोटी सही करून फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

श्री माहेश्वरी ट्रेडर्स यांनी शेत माल खरेदी करुन रोकड बुकवर खोटी सही करून फसवणूक केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल

तिरुपती मारोती शिदे रा. लाब्दी मंडळ बासर जि. निर्मल येथील रहिवाशी यांनी मागील काही कालावधीपासून बासर रोड येथे त्रिशु पाटील लाब्दीकर या नावाने शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत आहे.

माझ्याकडे आलेला माल मी धर्माबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकृत अनुज्ञप्तीधारक श्री माहेश्वरी ट्रेडर्स, धर्माबाद याचे प्रो. प्रा. योगेश श्रीगोपाल छापरवाल यांच्याकडे देत होतो व त्यांनी माझ्याकडील मालाचे पैसे या अगोदर वेळोवेळी दिले असल्याने मी त्यांचावर विश्वास ठेवून माझा माल त्यानांच देत होतो.

मी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी गाडी क्र. ए.पी.39 यु.एफ 1841 द्वारे चना ज्याचे एकूण वजन 30290 किलो व गाडी क्र. ए.पी.16 टी.ई. 0789 याद्वारे दिनांक 04.मार्च 2025 रोजी चना ज्याचे एकूण वजन 30210 किलो विक्री केले आहे. ज्याची एकूण अंदाजित किंमत 32,00,000/- (अक्षरी बत्तीस लाख रुपये) होत आहे. माल विक्री केल्यानंतर मी त्यांना पैशाची मागणी केल्यानंतर आज माझ्याकडे पैसे नाहीत, मी पुन्हा पैसे देतो असे सांगितले.मी त्यांना माझ्या धनादेशचा फोटो वॉटस्अप द्वारे पाठविले. मला ते माझ्या अकाउंट पर पैसे टाकतो म्हणून आश्वासन दिले असल्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास होता
मला पैसे मिळतील या आशेवर मी राहीलो.

काही दिवसानंतर मी माझ्या खात्याची स्टेटमेंट चेक केल्यानंतर मी श्री योगेश छापरवाल यांना माझे त्यांच्याकडे येणे असलेल्या पैश्याबाबत विचारणा केली असता थोडे थांब, मी तुम्हाला तुमचे पैसे देतो अशी विनंती केली. त्यानंतर परत मी त्यांना पैशाबाबत विचारणा केली असता आज-उद्या असे म्हणून टाळाटाळ केली. मला माझे पैसे मिळत नसल्याने मी त्यांच्या दुकानात जाऊन पैशाची मागणी केली असता मी तुला पैसे दिले आहेत.माझ्याकडे तशी चिट्टी आहे अशी बतावणी करुन उडवा उडवीची उत्तरे देऊन तुला पैसे देत नाही. तुला काय करायचे ते कर, अशी धमकी दिली. मग मी विचार पुस केली असता बारदानच्या व्यवहाराचे सही किंवा खोटी सही दिनांक 06 मार्च 2025 रोजी रोकड बुक वर खोटी सही दाखवून उडवा उडवीचे उत्तर दिले आहे

मला न्याय मिळवून दयावा अशी तक्रार तिरुपती मारोती शिंदे यांनी धर्माबाद पोलीस स्टेशन येथे दि 15 जुलै 2025 रोजी दिली आहे.

Back to top button