रत्नागिरी

खेडच्या कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची पहिली अत्याधुनिक प्रणाली यशस्वी

खेडच्या कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आयुष्मान भारत डिजिटल मिशनची पहिली अत्याधुनिक प्रणाली यशस्वी

खेड :
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड-१९ सेलचे माजी प्रमुख आणि सध्या आयसीआयसीआय फाउंडेशनच्या सीएसआर प्रकल्पाचे समन्वयक असलेले खेड चे सुपुत्र कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन (धारावी), के.एम. हॉस्पिटल, आणि नायर डेंटल हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत डिजिटल मिशन (एबीडीएम) एकात्मिक (ओपीडी) व्यवस्थापन प्रणाली यशस्वीरित्या राबवली गेली आहे. गर्दीच्या आणि उच्च रुग्णभार असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये ही प्रणाली देशातील पहिली असून, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा अधिक पारदर्शक, जलद व परिणामकारक करण्यात आली आहे.

कोविड काळातील नेतृत्व आणि आजचे डिजिटल आरोग्यदूत
कोविड-१९ महामारीच्या काळात, कौस्तुभ बुटाला यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या कोविड सेलचे प्रमुख म्हणून राज्यात संकट व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे आणि समन्वयामुळे राज्यातील आरोग्यसेवा सक्षम राहिली. आता त्यांनी त्या अनुभवाचा वापर करून सार्वजनिक आरोग्यसेवा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांचा पाहुणचार आणि गौरव
वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री हसन मुश्रीफ यांनी धारावी अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरला भेट देऊन या प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी रुग्ण म्हणून सर्व प्रक्रिया स्वतः पार पाडली आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेचे, तसेच डिजिटल पद्धतीने आरोग्य नोंदी तयार होण्याचे विशेष कौतुक केले. त्यांनी कौस्तुभ बुटाला यांच्या नेतृत्वाखालील टीमच्या कार्याचे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे मनापासून कौतुक केले.

प्रणालीची वैशिष्ट्ये: रुग्णांसाठी सुलभता आणि पारदर्शकता
स्वयंचलित हेल्थ किऑस्क्स
रुग्ण स्वतः उंची, वजन, रक्तदाब, ऑक्सिजन यांसारखी vitals मोजू शकतात, जी थेट डिजिटल केस पेपरवर सेव्ह होतात.
एबीडीएम एकात्मिकता

Back to top button