📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

‘महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये रेल्वेचे योगदान’ चित्रकला स्पर्धेत आरव गिरीची उल्लेखनीय कामगिरी

‘महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये रेल्वेचे योगदान’ चित्रकला स्पर्धेत आरव गिरीची उल्लेखनीय कामगिरी
बीड ( सूर्योदय न्यूज) : ‘महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये रेल्वेचे योगदान’ या विषयावर आयोजित चित्रकला स्पर्धेत कु. आरव अनिल गिरी याने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते कु. आरव अनिल गिरी याला प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. या सन्मानामुळे आरवच्या कलागुणांना तसेच त्याच्या मेहनतीला मोठे प्रोत्साहन मिळाले आहे.
लहान वयातच चित्रकलेच्या माध्यमातून आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या आरवने मिळविलेल्या या यशामुळे गिरी परिवाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. त्याच्या यशाचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांकडून कौतुक होत असून, पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या कार्यक्रमास मा. खा. बजरंग बप्पा सोनवणे, मा. आ. प्रकाशदादा सोळंके, मा. आ. धोंडे साहेब, मा. आ. विजयसिंह पंडित, तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरवच्या या यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कलाक्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
Back to top button