बीड
पि.टी.आर. न मिळालेल्या अतिक्रमण धारकांसाठी सोमवार मंगळवार दोन दिवसाचा कॅम्प

पि.टी.आर. न मिळालेल्या अतिक्रमण धारकांसाठी सोमवार मंगळवार दोन दिवसाचा कॅम्प
पि.टी.आर. न मिळालेल्या अतिक्रमण धारकांनी कागदपत्रांची पूर्तता करावीं – नगराध्यक्ष सौ.गिताभाभी पवार मुख्याधिकारी विक्रम माडुरके
गेवराई (सूर्योदय न्यूज) -शासन निर्णयानुसार निवसी अतिक्रमण काय्यम करण्याची प्रक्रिया गेली तिन चार वर्षापासुन नगरपालिकेच्या वतीने सुरू आहे तर आज पर्यंत संजयनगर मध्ये 550 अतिक्रमण धारक कुटुंबाना पि.टी.आर. वाटप करण्यात आले आहे तर साठेनगर, संघमित्र नगर, संतोषनगर मध्ये 380 अतिक्रमण धारक कुटुंबाना पि.टी.आर. वाटप करण्यात आले आहे तर यादीत नाव आहे पण पि.टी.आर . मिळाला नाही अशा अतिक्रमण धारकांसाठी दि.21 व22 सप्टेंबर सोमवार, मंगळवार रोजी दोन दिवसाचा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे
तरी ज्यांचे नाव यादीत आहे पण पि.टी.आर. मिळाला नाही अशा अतिक्रमण धारकांसाठी न.प. ने कॅम्प आयोजित करण्यात आला आहे तरी राहीलेल्या लोकांनी खालील कागदपत्रे घेऊन नगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांच्याकडे
खालील आवश्यक कागदपत्रे
2005 च्या यादीतील अनुक्रमांक
दारीद्रे खालील न.प. प्रमाणपत्र
महीला बचतगटाचे जुने बॅक पासबुक
2011 च्या पुर्वीचे लाईटबील
2011 पुर्वीची नळकनेक्शनची जुनी पावती असे आवश्यक कागदपत्रे घेऊन संजयनगर येथील उत्तर बाजुतील अतिक्रमण धारकांसाठी सोमेश्वर मंदिर संजयनगर हे ठिकाण आहे तर दक्षिण बाजु व भटक्या विमुक्त भागातील नागरिकांसाठी भुमी अभिलेख कार्यालय समोर संज्जु बागवान यांच्या दुकाना जवळ ठिकाण निश्चित केले आहे
साठेनगर, संतोष नगर येथील अतिक्रमण धारकांसाठी अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह येथे ठिकाण निश्चित केले आहे तरी यादीत नाव आहे पण पि.टी.आर. आला नाही अशा अतिक्रमण धारकांनी वरील कागदपत्रे घेऊन नगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करावी असे आवाहन नगराध्यक्ष सौ.गिताभाभी पवार व मुख्याधिकारी विक्रम माडुरके साहेब यांनी केले आहे



