
कास्ट्राईब महासंघाच्या पाठपुराव्याला यश
——————————
*आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक जादा वेतनवाढीचा लाभ मिळणार….*
गेवराई दि.11 सन 1996 पुर्वी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक जादा वेतनवाढ नियमित पणे दिली गेली, त्यानंतरच्या शिक्षकांना अचानकपणे ती नाकारली.त्यानंतर कायदेशीर लढाई जिंकुन ही जिल्हा परिषद प्रशासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत होते, परंतु कास्ट्राईब महासंघाच्या सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.विहित व आवश्यक तो सविस्तर संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत दाखल केलेला होता तरीही जि.प.कडे इच्छाशक्ती चा अभाव होता,मात्र जि.प.चे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हि बाब लक्षात आणून देताच त्यांनी तातडीने सकारात्मक पावले उचलत आज दि.11 रोजी यासंबंधीचे आदेश शिक्षणाधिकारी यांना पारित करावयास लावले व तसा सविस्तर आदेश आज पारित करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाचे सुधारीत आदेश तसेच मान.उच्च न्यायालयाचे आदेश या आधारे न्यायालयात गेलेले व अन्य पात्र लाभधारक तत्कालीन शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी आपापले सविस्तर प्रस्ताव जि.प.कडे सादर केले होते व याप्रकरणी कास्ट्राईब महासंघाचे केंद्रीय महासचिव बापूसाहेब ससाणे, विभागीय कार्याध्यक्ष सुग्रीव तावरे, विभागीय उपाध्यक्ष विजय डोंगरे,जिल्हा महासचिव सदाशिव भालेराव, उपाध्यक्ष अमोल आतकरे, कामरान शेख, राहुल क्षीरसागर, अमोल आतकरे,विश्वभुषण सोनवणे, दयानंद खोपे,सुनिल सुतार, आकाश जाधव,विनायक किर्तने, सुरेश ढाकणे, नवनाथ बनसोडे, एल.आर.शिंदे, डि.यु.कांडेकर आदींनी सातत्याने याचा आवश्यक तो पाठपुरावा केला होता,आता या पाठपुराव्याला यश मिळाले असुन जवळपास 88 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत .सन 2000पुर्वीच्यांना दि.12/12/2000 पासुन व त्यानंतरच्यांना पात्रता धारण दिनांकापासून हे लाभ देय करण्यात आले आहेत.
कास्ट्राईब महासंघाच्या या शिक्षक हिताच्या मागणीला जि.प.ने सकारात्मक प्रतिसाद देत हा आदेश निर्गमित केल्याबद्दल जि.प.चे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जितीनजी रहेमान,उप मु.का.अ.प्रदिपजी काकडे, शिक्षणाधिकारी मा.प्रियाराणी पाटील व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मनस्वी आभार मानले आहेत.तर या आदेशामुळे जिल्हा भरातील शिक्षकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.



