📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

गावंजी कापसे यांनी निष्ठेने कर्तव्य बजावले—-रणवीर पंडित

गावंजी कापसे यांनी निष्ठेने कर्तव्य बजावले—-रणवीर पंडित
गेवराई दि.३० (प्रतिनिधी):- जयभवानी विद्यालयाचे मुख्य लिपिक गावंजी कापसे यांनी निष्ठेने काम करत कर्तव्य बजावले. त्याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांनी केले. जयभवानी विद्यालयातील मुख्य लिपिक गावंजी कापसे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले यावेळी रणवीर पंडित बोलत होते.
गावंजी कापसे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाला शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, जयभवानी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, सहप्रशासनाधिकारी प्रा.गोगुले, प्रताप  हाटोटे, सदाशिव तौर, संजय सुतार
मुख्याध्यापक वसंत राठोड, राजेंद्र
 जगदाळे, मुरलीधर पवार, प्रा.मासाळ, प्रमोद पंडित, सय्यद युनूस, शिवाजी पाटोळे, प्रा. मासाळ, अनंत डावकर, प्राचार्य डॉ‌. सरकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कापसे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक हरीभाऊ हाकाळे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक राठोड, प्रमोद गोरकर, संतोष सुतार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मच्छिंद्र रोकडे, संतोष सुतार, कमलाबाई हातागळे, निलेश भाकरे, विजय सुतार, बंडू सुतार, संजय सुतार, अमोल सुतार, मच्छिंद्र रोकडे, नंदू सुतार,  कमलाकर हातागळे, रजनी सुतार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button