राजकीय

अजित पवार आतातरी बनवाबनवी थांबवा; किरीट सोमय्या यांनी साधला पुन्हा निशाणा

 

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमतेची चौकशी केली जात आहे. यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार आता तरी आपल्याकडून केली जात असलेली हि बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा, आता काहीही होणार नाही,’ अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट मय्या यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, अजित पवार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे हजारो कोटीहून अधिकची संपत्ती आहे. ८ पेक्षा अधिक शहरात त्यांचं बेनामी साम्राज्य पसरले आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राज्यातील जनतेला मूर्ख बनवणे थांबवले पाहिजे. तुमच्या कौटुंबिक मित्र कंपन्यांचे हजारो कोटीहून अधिक बेनामी आणि नामी साम्राज्या ८ पेक्षा अधिक शहरांमध्ये पसरले आहे. स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग/मेन कंपनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्थापन केली होती. त्यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले होते, ते परत आले की नाही? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. यावर आता राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Back to top button