राजकीय

”वसुलीचा पैसा अनिल परब यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे जायचा” सोमय्या यांनी केला आरोप !

 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत आहेत. आता याप्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

आता इतर नेत्यांचा नंबर आला आहे. वसुलीचा पैसा मुलगा, जावई, भागीदार… आणि अनिल परब यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपर्यंत पोहोचत होता. अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीने बजावला समन्स अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख सध्या ईडीच्या कोठडीत आहे. काल अनिल देशमुख यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ईडीने ऋषिकेश देशमुख यांनाही समन्स बजावला आहे. आज त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.

याआधीही ईडीनं ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला.

या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही. एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

तसंच देशमुख मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात थेट सहभागी होते, त्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. अनिल देशमुख या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा म्हणून पुढे आलं असल्याचं ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणात परकीय षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही ईडीने म्हटलं आहे.

Back to top button