बीड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा ; श्री नागेश विद्यालयात गौरव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा ; श्री नागेश विद्यालयात गौरव

जामखेड :डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे, व महापुरुषांचे नेहमी स्मरण करावे असे प्रतिपादन केंद्र प्रमुख नवनाथ बडे यांनी केले .

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा व शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंतांचा गौरव करणारा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य बी. के. मडके यांनी केले. विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवर :
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख नवनाथ बडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील, स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, प्रा. मधुकर राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, विनायक राऊत, उपमुख्याध्यापक नाळे एस., पर्यवेक्षक कोकाटे विकास, अमोल बहिर, अशोक यादव, केशवराज कोल्हे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, रघुनाथ मोहळकर, साळुंखे बी. एस., एनसीसी ऑफिसर मयुर भोसले आदी मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेरणादायी मनोगते :
सुरेश भोसले यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा आंबेडकरी मंत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.
हरिभाऊ बेलेकर यांनी बाबासाहेबांचे कार्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी नागेश विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र असल्याचे सांगून स्पर्धा परीक्षांची तयारीही येथे होत असल्याचे अधोरेखित केले.

गुणवंतांचा सत्कार :
या कार्यक्रमात एनएमएमएसच्या 40 विद्यमान, आरटीएसच्या 2 विद्यमान व मागील वर्षाच्या एनएमएमएसच्या 52 आणि स्कॉलरशिपच्या 12 विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला.

शिक्षकांचा गौरव :
या यशामागील मार्गदर्शक शिक्षक – प्राचार्य मडके बी. के., सोमनाथ गर्जे, अशोक सांगळ, संतोष पवार, ज्ञानेश्वर लटपटे, अशोक चौधरी, श्रीमती ढाकणे एस. एस., निलेश अनारसे, कृष्णा मुरकुटे, रणदिवे एस. आर., गोपाल बाबर, साईप्रसाद लोखंडे, शंकर गुट्टे – यांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विशेष सन्मान :
नान्नज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे संचालक बळीराम मेहेर, विजय रेणुके, अशोक चौधरे यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल विद्यालयाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे आणि सोमिनाथ गर्जे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी केले.

Back to top button