नागपूर येथे कामगारांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनास हजारोच्या संख्येने उपस्थित रहा- रामधन जमाले
बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ची राष्ट्रीय अध्यक्ष डॉं.जी.संजीवा रेड्डी यांच्या व महाराष्ट्र इंटक प्रदेशाध्यक्ष डॉं.कैलास भाऊ कदम यांच्या आदेशावरून देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या नवे ४ कामगार कायदे (Labour Codes) रद्द करण्याच्या मागणीसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन दरम्यान दि. ११ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी यशवंत स्टेडियम, धनतोली, नागपूर येथे धरणे आंदोलने, निदर्शने करण्यात येणार आहे.या कायद्यांमुळे कामगारांना रोजगाराची सुरक्षा, वेतन संरक्षण, आरोग्य–सुरक्षा व संघटन स्वातंत्र्य धोक्यात येणार असून सर्व कामगार बंधु भगिनींनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय कामगार काँग्रेस ( इंटक ) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमले यांनी केले आहे.