बीड

गेवराई श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुचरित्र पारायण संपन्न

गेवराई श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुचरित्र पारायण संपन्न
गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दि 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान गुरुचरित्र पारायण संपन्न झाले असून या पारायणाला 341 भाविक भक्त बसले होते. यावेळी अनेक भाविक भक्तांनी या पारायणाचा लाभ घेतला.
                याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरांमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा केंद्रामध्ये दि. 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान गुरुचरित्र पारायण संपन्न झाले या पारायणाची दि. 15 एप्रिल रोजी समाप्ती झाली हे पारायण सकाळी आठ ते दहा या वेळेत होत होते. तसेच या ठिकाणी रुद्र यज्ञ व श्री मल्हार यज्ञ याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक भाविक भक्तांनी गुरुचरित्र पारायण व यज्ञाचा लाभ घेतला तसेच दि. 16 गुरुवार रोजी आरोग्य शिबिर व मोफत नाडी तपासणी व सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी होणार आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दररोज स्वामींची आरती केली जाते तसेच धार्मिक विविध कार्यक्रम ही वर्षभर या ठिकाणी राबवले जातात.
Back to top button