बीड

गटशिक्षणाधिकारींच्या हस्ते जि.प. प्रा. केंद्रशाळा तेलंगशीचा सत्कार

गटशिक्षणाधिकारींच्या हस्ते जि.प. प्रा. केंद्रशाळा तेलंगशीचा सत्कार

जामखेड प्रतिनिधी: तालुक्यातील तेलंगशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र,शाळा तेलंगशी येथे वर्ग १ली ते ७वी पर्यंत असून सध्या तेथील पट संख्या १५१ आहे. शाळेत कार्यरत शिक्षक ७ असून शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा स्कोर(SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकन अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या फक्त पाच शाळांना अ+ श्रेणी मिळाली असून त्यामध्ये आपल्या शाळेला अ+ श्रेणी मिळाल्याबद्दल तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये जामखेड तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

त्याअंतर्गत शाळेला १ लाख रुपये मिळणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रेवनाथ ढाळे तसेच गावच्या सरपंच सौ.कविता दिगंबर ढाळे, सदस्य व ग्रामस्थ, तसेच गटशिक्षणाधिकारी श्री.प्रदीप चव्हाण, खर्डा बीडचे विस्ताराधिकारी श्री.अशोक आंधळे व तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.केशव गायकवाड यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

श्रीम.गायकवाड मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शिक्षकांना पेन भेट दिले व मनोगत व्यक्त करताना स्वतःच्या गावात सन्मान झाल्याने त्यांना गहिवरून आले. अनमोल असे मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षा, गुणवत्तेसंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.संतोष गोरे, श्री.मल्हारी पारखे,श्री.अशोक जाधव, श्री.रविंद्र धस, श्री.संतोष खेडकर, श्री.बाळासाहेब खेडकर, श्री. शशिकांत वैद्य आदी उपस्थित होते

Back to top button