बीड
बीड सेक्टर राष्ट्रीय छात्र सेनेकडून जलाशय स्वच्छता अंतर्गत बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिम संपन्न

बीड सेक्टर राष्ट्रीय छात्र सेनेकडून जलाशय स्वच्छता अंतर्गत बिंदुसरा नदी स्वच्छता मोहिम संपन्न
बीड प्रतिनिधी, 03 डिसेंबर 2025 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेना 51 महाराष्ट्र बटालियन एनसीसी बीड सेक्टर च्या वतीने “पाणथळ परिसर स्वच्छता अभियान” विषयक मार्गदर्शन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमासाठी सौ.के.एस. के.महाविद्यालयाचे कॅप्टन डॉ. बाळासाहेब पोटे यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात त्यांनी परिसरातील नद्या व पाणथळ स्वच्छ ठेवणे काळाची गरज आहे,भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे गरजेचे आहे तसेच स्वच्छतेमुळे पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “नद्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर मानवी अस्तित्व देखील धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी ही निसर्गाची आपल्याला मिळालेली अनमोल देणगी आहे. त्यामुळे नद्यांचे विद्रूपीकरण न करता त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”यावेळी बीड शहरातील बिंदुसरा नदी स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. नदीमध्ये जमा झालेला प्लास्टिक कचरा, गाळ आणि इतर प्रदूषित पदार्थ काढून पाणथळ परिसराचा स्वच्छतेचा उपक्रम हाती घेण्यात आला. कॅप्टन डॉ. बाळासाहेब पोटे यांनी सांगितले की, “आपणच नद्यांमध्ये कचरा टाकतो आणि नंतर त्याच पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी खर्च करतो. त्यापेक्षा कचरा न टाकता नदी स्वच्छ ठेवली, तर नैसर्गिकरित्या स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा मिळू शकते.”
या कार्यक्रमासाठी श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्रसेना प्रमुख लेप्ट.डॉ. जगन्नाथ चव्हाण, यांनी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाला बलभीम महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख कॅप्टन डॉ.सुनिता भोसले लेप्ट.डॉ.शैलेश अकुलवार, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभियानात श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बलभीम महाविद्यालय आणि सौ.के.एस.के. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.