महाराष्ट्र

फडणवीस माझ्या धाकट्या भावासारखे, वडेट्टीवारांच्या कानात काहीही सांगितलेले नाही

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच नागपूर येथील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाला मंत्री विजय वडेट्टीवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान वंदितवारी यांनी मंत्री गडकरी यांच्या कानात काहीतरी सांगितले होते. यावरूनच वेगळ्या चर्चाना उधाण आले होते यावर आता नितीन गडकरी यांनी भाष्य केले आहे.

गडकरी म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात आपण ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना कधीही कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा चिमटा केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला आहे.

नितीन गडकरी म्हणाले, फडणवीस यांच्याविरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या भाषणाची क्‍लिप पाहून मला आश्‍चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत असे विधान गडकरी यांनी केले होते.

Back to top button