संपादकीय

सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई,

 

सोलापूर | सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राजेश काळे हे भाजपचे नगरसेवक असून महानगरपालिकेत विद्यमान उपमहापौर म्हणून कार्यरत आहेत. महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ केल्याने उपमहापौर राजेश काळे हे चर्चेत आले होते.

काळे यांच्यावर खंडणीसह विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमुळेच सोलापूर पोलिसांनी उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षांसाठी तडीपार घोषित केलं आहे.
सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यांना दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.

सोलापूर, उस्मानाबादमधून तडीपार सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी सांगितले की, सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साद्य़ करण्याच्या हेतून राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाह्य पद्धतीने काम करण्यसाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरिक आणि व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणे करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरिकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या राजेश काळे याला सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे.

Back to top button