आरोग्यबीड

पिसेगाव कोविड सेंटर केज येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवारांची भेट

पिसेगाव कोविड सेंटर केज येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवारांची भेट.

प्रतिनिधी: केज

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी आज शुक्रवारी पिसेगांव स्थित कोरोना केअर सेन्टर ला भेट देऊन रुग्ण कक्षात जाऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधला.दरम्यान स्वच्छता व जेवनाविषयी समाधान व्यक्त केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले व नोडल अधिकारी डॉ.आसाराम चौरे यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून रुग्ण समाधानी आणि बरे होण्याचे प्रमाण वाढल्याबद्दल त्यांच्या सर्व टीम चे कौतुक केले.

यावेळी भ्रष्टाचार मुक्त जनांदोलनाचे ऍड.अजित देशमुख ता.आ.अधिकारी विकास आठवले,नोडल अधिकारी डॉ. आसाराम चौरे,डॉ.सोनवणे मॅडम,सचिन शिंदे,गणेश काळे,स्नेहल हजारे,वंदना भोसले,ऋषीकेश मुंडे,जय जोगदंड,अतुल थोरात,विक्की हजारे,राहुल पटेकर, यासिन शेख,सुरक्षा रक्षक बालाजी मुंडे व माने मामा इ.उपस्थित होते..

Back to top button