बीडसंपादकीय

झाडे लावण्याची ती जगवण्याची लोकचळवळ उभी राहिली पाहिजे – राहुल मोरे

बीड- (प्रतिनिधी)

या कोरोना महामारी जीव मुठीत धरून जगण्याची वेळ या अहंकारी माणवावर आली पुन्हा एकदा आपल्या स्वप्नाच्या मागे धावणाऱ्या या मानवी समाजाला ‘आरोग्य हीच खरी धनसंपदा’ आहे हे, कळून चुकले आहे तरी जीवन जगण्यासाठी महत्त्वाची ही सृष्टी किती अनमोल आहे हे ही त्यांना कळाले असून प्राणवायूचे महत्त्व या काळात लोकांना समजले आहे आता तरी या नेसर्गिक ठेवायचे जतन,संवर्धन करण्यासाठी आपल्या घरात जितकी माणसे आहेत तितकीच झाडे लावून त्यांचे जतन,संवर्धन करावे असे आवाहन क्रीडा शिक्षक राहुल आर. मोरे यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरणीय समस्या या मानवनिर्मित असून मानवाने आपल्या स्वार्थी भावनेतून जे मानवी क्रांतीच्या नावाखाली पर्यावरणाचा जोरादार र्हास चालला आहे तो त्वरित थांबून या नैसर्गिक ठेवव्याच्या वाढीसाठी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे.जंगले पर्यावरणाची फुप्फुसे असून ते आहेत, म्हणून ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन आहे म्हणूनच आपण आहोत हे लक्षात घेऊन मानवाने वेळीच शहाणं होऊन वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे व पृथ्वीवरील ग्रीन क्वीन कवर वाढवीण्यास लहानांपासून थोरांमोठ्याचापर्यंत सहभाग असणे महत्त्व असून आज काळाची गरज आहे. या महामारी ने आपल्याला स्वतःची काळजी घेत निसर्गावर आपण प्रेम करा अशी शिकवण दिली असून आपल्या पृथ्वी ला हिरवेगार पांघरूण घालण्यासाठी सहकार्य केले पाहिजे व आपली जैवविविधता टिकविण्यासाठी सर्व परीने सहकार्य करण्याची गरज आहे.

वृक्ष सदैव माणसाच्या साहाय्यालाच असून प्रत्येकाने आपल्या परीने झाडे लावण्याची ती जगण्याची वाढवण्याची जबाबदारी घ्यावी व या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तरच आपण सुखी, समृद्ध जीवन जगू असे क्रीडाशिक्षक राहुल आर. मोरे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले आहे.

Back to top button