बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

पुन्हा देशाने पाहिला मराठ्यांचा संयम, बीडमध्ये मराठ्यांची पुन्हा वज्रमूठ.

🔸अशोक काळकुटे | संपादक

  मराठा समाजाला शैक्षणिक आणि नौकरीत मिळलेले आरक्षण ५ मे रोजी पुन्हा रद्द झाले आणि लाखोंचे मुक आदर्शवत निघालेले मोर्चे आणि ४८ तरूणांचे बलीदान व्यर्थ गेले. यामुळे मराठा समाजाचा संयम सुटला की काय असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामध्येच बीडमध्ये ५ जून रोजी आमदार विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती गुन्हे दाखल करू असे प्रशासनाने ठणकावून सांगितल्यानंतरही हजारोंच्या संख्येने समाज या मोर्चात सहभागी झाला.

या मोर्चा कडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते हा मोर्चा पुन्हा एकदा ऐतिहासिक ठरला हजारोंच्या संख्येने समाज यामध्ये सहभागी झाला. परंतु या वेळेला मात्र कुठेतरी समाजातील तरुणांचा संयम सुटेल अशी भिती होती. कुठेतरी उद्रेक होईल हिंसा होईल अशी भिती प्रशासनालाही होती. यामुळे प्रशासनाने शहरात चोहो बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. परंतु पुन्हा एकदा देशाने बीड जिल्ह्यात झालेल्या विराट ऐतिहासिक मोर्चातील मराठा समाजाचा संयम पाहिला आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुला पासून सुरु झाला तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला यानंतर जिल्हाधिकारी. यांनंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त केले आहे. आतापर्यंत संयमी मोर्चे आणि आंदोलनं झाली परंतु या नंतर मात्र पुढील होणारे मोर्चे आणि त्या वेळची भूमिका वेगळी असेल असा इशारा आमदार विनायकराव मेटे यांनी दिला आहे. तर समाजासाठी पोटाला बॉम्ब लावून उडून देऊ असा ईशारा नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी दिलाय.

अन्यथा पुढची तोफ थेट मुंबईवर डागणार-आमदार मेटे.
आज आमदार विनायकराव मेटे यांची भुमिका ही आक्रमक पाहायला मिळाली मंचावर विचार आणि मागण्या मांडत असताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांवरही त्यांनी निशाणा साधला. चव्हाणासारखा मुर्ख आणि नालायक माणुस दुसरा कोणी नाही. म्हणुन त्यांची तात्काळ हकालपट्टी अन्यथा आंदोलन आक्रमक असा ईशारा मेटेंनी दिला आहे. तर केंद्र सरकारने आरक्षण रद्द झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात पुनर्विचार याचिका दाखल केली परंतु राज्य सरकार अद्याप पर्यंत याचिका किंवा पुनर्विचार याचिका दाखल करू शकत नाही. तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा येत्या काळात औरंगाबाद, नाशिक, आणि अशोक चव्हाणांच्या छाताडावर नांदेडमध्ये मोर्चा निघेल आणि अखेरचा मोर्चा मोर्चा हा मुंबईवर धडकणार असे मेटे म्हणाले. मोर्चा काढू असे सांगितल्यानंतर यांच्या गां…. खालची वाळु सरकली पुढे आम्ही कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने मागून लाद घातली आणि तोंडावर पडल्यानंतर यांनी ई.डब्लू.एस च्या आरक्षणाचा जी.आर काढला हे यश सुध्दा आजच्या मोर्चाचे आहे. असेही मेटे बीड येथे आज संपन्न झालेल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चादरम्यान म्हणाले.

कट्टर मराठा शांत बसणार नाही – गरज पडली तर पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकु
  आमचा सरकार कट्टर मराठा शांत बसणार आहे का ? आता कट्टर मराठा शांत बसणार नाही गरज पडली तर पोटाला बॉम्ब लावून बाकीच्यांना उडवून टाकू पण मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ असा सरकारला कडक इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री म्हणतात पुरवून आहे उपमुख्यमंत्री म्हणतात करून आहे असंही तुम्ही आम्हाला मारूनच टाकलं आहे. मग काय झालं आम्ही एकत्र आलोत तर असंही आम्ही कोणाच्या बापाला भितो काय ? असे बोलत मोर्चा बाबत सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा करणाऱ्यांना नरेंद्र पाटलांनी उत्तर दिलं आहे. आता पुन्हा एकदा बीडमधून मोर्चाला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आहे आता संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असेही पाटील यावेळी बोलताना म्हणाले. जिथे मोर्चा आंदोलन असेल तिथे जा आम्हीही येवु पक्ष आणि संघटना बाजुला ठेवुन या लढ्यासाठी एकत्र या असे आवाहन पाटील यांनी केले.

२७ तारखेला मुंबईत निघणार बाईक रॅली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत पुन्हा एकदा मराठा समाजाचा एल्गार. २७ जुन २०२१ रोजी मुंबईत भव्य दिव्य आणि विराट अशी बाईक रॅली काढून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात येणार आहे. यासाठी हजारो-लाखोंच्या संख्येने या बाईक रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी आमदार विनायकराव मेटे आणि नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी केले आहे.

मोर्चाला नव्हती परवानगी… कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे या मोर्चाला प्रशासनाने स्पष्टपणे परवानगी नाकारली होती. मोर्चा काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही प्रशासनाने दिला होता. परंतु या मोर्चात सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे या मोर्चाला परवानगी नसताना आणि विरोध होत असताना समाजाच्या भावना हजारोंच्या संख्येने आलेल्या समाजबांधवांतून व्यक्त झाल्या आणि पुन्हा एकदा मराठा समाजाचा हा मोर्चा ऐतिहासिक ठरला.कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे या मोर्चाला प्रशासनाने स्पष्टपणे परवानगी नाकारली होती. मोर्चा काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही प्रशासनाने दिला होता. परंतु या मोर्चात सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे या मोर्चाला परवानगी नसताना आणि विरोध होत असताना समाजाच्या भावना हजारोंच्या संख्येने आलेल्या समाजबांधवांतून व्यक्त झाल्या आणि पुन्हा एकदा मराठा समाजाचा हा मोर्चा ऐतिहासिक ठरला.

Back to top button