बीडब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा आरक्षण संघर्ष मोर्चाने सरकारला घाम फोडून कुटणीतीचा पर्दाफाश केला ।


बीड ।। प्रतिनिधी

बीडमध्ये काल शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात सर्व समाज बांधवांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो बांधव उपस्थित राहिले आणि ना भूतो न भविष्यती असा पहिला विराट मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा दिसून आला यावेळी महिला भगिनींचा पण प्रचंड उत्साह व सरकार विरोधी आक्रोश पहायला मिळाला.

तरुण बांधव पण मोट्या प्रमाणात सामील झाले होते विशेष म्हणजे कोरोनाचे सर्व नियम पाळून या मोर्चात सर्व जण सामील झाले आणि मराठा समाजाला तात्काळ कायदेशीर बाबी पडताळून आरक्षण मिळावे असा सूर सर्व समाजांच्या घटकांमध्ये होता आणि मेटे साहेब सर्वांच्या साथीने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी जी तळमळ करत आहेत त्यातून असच दिसत आहे की लवकरच या निद्रावस्थेत असलेल्या सरकारला जाग येईल आणि आपल्या गरीब मराठा समाज बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळेल आज झालेल्या या मोर्चाने सरकारची पळता भुई थोडी होऊन झोप उडाली हे मात्र सत्य आहे

Back to top button