मुंबई

नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, मोहित कंबोज यांचा मालिकांवर गंभीर आरोप

 

राज्यात ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आले असून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यासह भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर विविध आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांचे मेव्हणे त्या रात्री उपस्थित असल्याचा मलिक यांनी आरोप केला होता. त्यानंतर आता प्रभाकर साईल याने हे सर्व प्रकरण २५ कोटींच्या वसूलीसाठी करत असल्याचा गंभीर आरोप एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीवर केला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या टीकेवर आता जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर आरोप हे नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून केले आहेत, असं मोहित कंबोज यांनी सांगितलं आहे. मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. शेअर करताना त्यांनी कॅपश्न्समध्ये लिहिताना नोटरी राम जी गुप्ता स्टिंग ऑपरेशन्स असं लिहीलं आहे.

तसेच रामजी म्हणतात प्रभाकर साईलने हे सर्व किरण गोसावीकडून पैशासाठी केलं आहे. या प्रकरणामागे मिया नवाब आणि मनोज असल्याचं स्पष्ट सांगत आहे. पुढं मोहित कंबोज म्हणाले, की मी एका काळ्या टी-शर्टचा उल्लेख केला होता. त्याचं नाव कुणाल जैन आहे. ज्याचे की बॉलिवूडमधील अभिनेत्यांशी आणि अनेक मंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. याबाबत मी लवकरच खुलासा करणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

Back to top button