संपादकीय

एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पगार, परहिवाहन मंत्री अनिल परब यांची माहिती

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. नव्या वेतनवाढीनुसार हा पगार जमा होणार आहे. ठरल्याप्रमाणे पगारवाढ आज खात्यात जमा केली जाईल अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. तसेच मेस्मा संदर्भात आज कुठलीही बैठक नाही, मेस्माबाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीतच होणार असल्याची माहिती मिळत आहे,

त्यातच कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाल्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पगारवाढीच्या घोषणेनंतर सरकार प्रत्यक्षात खात्यात किती रक्कम जमा करणार याकडे आंदोलनातील इतर कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. विलिनिकरणाच्या मुख्य मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पगार वाढ केल्यानंतर देखील काही कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत.

वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल १९ हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. दरम्यान जे कर्मचारी कामावर हजर आहेत, त्यांनाच मंगळवारी वेतन देण्यात येईल,असे सूचक वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. त्यामुळे आज कामावर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.कर्मचारी आता हळूहळू कामावर येऊ लागले आहेत.

राज्यातील २५० पैकी १०५ आगार सुरू झाले असून, एकूण कर्मचाऱ्यांपैकी १९ हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. परब यांच्या आवाहानाला कर्मचारी चांगला प्रतिसाद देत असून, सोमवारी राज्यभरात एसटीच्या १७०० पेक्षा अधिक फेऱ्या झाल्या आहेत. ज्यामधून एक लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Back to top button